सूर्या मराठी न्यूज ब्यूरो
कोंढाळी या भागातील रिगणाबोंडी, मिनीवाडा,मसाळा,चाकगेडोह आदी भागात गेल्या काही दिवसां पासुन पोपट,चिमन्या,कावळे,जंगली कबुतर आदी पक्ष्यांचा मोठया संखेत अज्ञात रोगाने मृत्यु होत आहे.रिगणाबोडी बोडी येथे तर झाडा खाली मृत पोपटांचा सळा पळला आहे.
रिगणाबोडी येथील पोलीस पाटील संजय नागपुरे यांनी रिगणाबोडी भागात मोठ्या संखेत पोपटांचा मृत्यु झाल्याची माहिती कोंढाळी चे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना माहिती दिली.या घटनेची माहिती मिळतच ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी काटोलचे तहसीलदार अजय चरडे यांना माहिती दिली.काटोलचे तालुका पशुधन अधिकारी व कोंढाळी चे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ.तुषार पुंड व सुधिर कापशीकर हे वाजता रिगणाबोंडी भागात गेले व झांडा झांडा खाली जावुन निरिक्षण केले असता मृत पक्षांचा खच पडला होता. डॉ.तुषार पुंड यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मजुषा पुंडलिक व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.युवराज केने यांना माहिती दिली जिल्हास्तरीय प्रयोग शाळेतील चमु नागपुर येथुन रिगणाबोडी कडे रवाना झाली.पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.युवराज केने नागपूर जिल्हा सर्व पशु चिकित्सालय चे प्रमुख डॉ.उन्मेश हिरूडकर,काटोल येथील तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय डॉ.निरंजन शेटे मृत पक्ष्यांचे नमुने गोळा केले.या पक्ष्यांचा मृत्यु कश्यांने झाला हे स्पष्ट करण्याकरीता हे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय वायरस प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे कारण राज्यात बर्ड फ्लु वायरस शोधनारी प्रयोगशाळा नसल्याने हे सर्व मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथे पाठवावे लागणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुढलिक यांनी दिली. पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी वन विभागाच्या मदतीने सर्व मृत पक्षांची सुरक्षित पध्द