केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी  – प्रकाश पोहरे  

 

खोलापूर येथे किसान जागृती सायकल यात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश पोहरे व व्यासपीठावर उपस्थित किसान ब्रिगेडचे पदाधिकारी
खोलापूर केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले नवी कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे जीवन अंधकारमय करणारे असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मृत्यूच्या खाईत ढकलणे होय, असे कायदे करून केंद्र सरकार शेतकऱ्यांना पूर्णपणे साम्राज्य वादाखाली आणेल, अशी घणाघाती टीका शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक व किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केली. ते खोलापूर येथे बोलत होते.

किसान जागृती सायकल यात्रेंतर्गत खोलापूर येथील श्री संत गजानन महाराज सभागृहात छोटेखानी सभा व संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश काकडे, गजानन अहमदाबादकर, अ‍ॅड.सतीशचंद्र रोठे, सुभेदार शेषराव मुरोडीया, उत्तर प्रदेशचे रामदास मानव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रकाश पोहरे यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना केंद्र सरकारने आणलेल्या या कृषी कायद्यांची पूर्णपणे चिरफाड केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारचा हाडाव अतिशय कुटील आहे.

केवळ काही साम्राज्यवादी घराण्यांनाच फायदा व्हावा, यासाठी हे कायदे प्रस्तावित केले आहे. हे कायदे कोणत्या कायदे मंडळाने केले नसून, अदानी, अंबानींच्या खासगी वक्त्यांनी केलेले आहे.

हे जसेच्या तसे स्वीकारून मोदीसरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करते आहे. कोरोनाच्या नावाखाली दहशत निर्माण करून त्यानिमित्ताने संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईस आणून एक वातावरण तयार करून हे कायदे शेतकऱ्यांवर लादले जात आहे. पंजाब, हरियाणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना ते वेळीच उमजले म्हणून ते या कायद्यांविरोधात पेटून उठले व त्यांनी आपल्या सर्व शक्तीनिशी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन सुरू केले आहे. आता आपलेही कर्तव्य आहे की, या आंदोलनाला पाठिंबा देणे. कारण या कायद्यांमुळे केवळ पंजाब, हरियाणाच्याच शेतकऱ्यांवर परिणाम होणार नसून, त्याचा परिणाम संपूर्ण देशातील शेतकऱ्यांवर  होणार आहे.

तसाच तो महाराष्ट्रातील तथा विदर्भातील आपल्या जिल्ह्यातील परिसरातील शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यामुळे सर्वांनी पेटून उठणे काळाची गरज आहे. कोरोना काळात दहशत निर्माण करून संपूर्ण शासकीय यंत्रणेला पूर्णपणे वेठीस धरल्या जात आहे. ३१ मार्चपर्यंत कोरोना पाडाचा पैसा परत जाईल, या भीतीने कोरोनाचे पेशंट वाढविण्याचा डावही प्रशासनाने आखला असल्याची टीका प्रकाश पोहरे यांनी यावेळी केली. या सभेला खोलापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन  किशोर चक्रे यांनी, तर आयोजन पवन देशमुख यांनी केले होते. यावेळी दिलीप ढोके,  निलेश माहोरे, कैलास बांगर, अमोल महात्मे,  शैलेश भटकर,  राजु थोरात, मोहम्मद राजिक,

Leave a Comment