केंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी प्रशांतभैया डोंगरदिवे यांची निवड

 

 

चिखली येथील एक आंबेडकरी चळवळीचे वैचारीक आंदोलणकर्ते तथा दैनिक जनतेचा महानायक, महाबोधी न्यूज चॅनल व न्यूज लोकनायक, विदर्भ वार्ता न्युज चे प्रतिनिधी प्रशांतभैया डोंगरदिवे यांचा पत्रकारिता क्षेत्राचा व सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य प्रभारी विनायक कांगणे यांच्या आदेशान्वये व केंद्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत कांबळे, यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महसूल विभाग प्रमुख सचिन बोंबले यांनी नुकतीच *बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख* पदी निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रशांतभैया डोंगरदिवे हे अभ्यासू पत्रकार असून ते केंद्रीय पत्रकार संघाला बुलडाणा जिल्ह्यात वाढण्याचे काम करतील. वृत्त लेखनाचे, वृतवाहिन्याचे अचूक लेखन/वृत्त संकलन करणा-या पत्रकार बांधवांना न्याय देतील. प्रशांतभैया डोंगरदिवे यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी असे सांगितले की माझ्यावर जी केंद्रीय पत्रकार संघाची बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी केंद्रीय पत्रकार संघाने सोपवली ती पार पाडत असतांना बुलडाणा च नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारीतेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दुर्लक्षित वंचित सर्व पत्रकार बांधवांना केद्रीय पत्रकार संघामध्ये सहभागी करून मुख्य प्रवाहात ताट माणेने चालण्यासाठी केद्रीय पत्रकार संघाचे सभासद नोंदणी ला प्राधान्य देऊन पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी मी तत्पर राहून दिलेल्या जबाबदारीचे सोने करेन व आमचे केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड,राज्य प्रभारी विनायक कांगणे,महाराष्ट्र राज्य महसूल विभाग प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष सचिन बोंबले,ज्यांच्या शिफारशीनुसार यांच्या पाठपुराव्यामुळे मला केंद्रीय पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्ह्यात स्थान मिळाले ते राज्य प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत कांबळे यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
प्रशांतभैया डोंगरदिवे यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.

Leave a Comment