कॅच द रेन अभियान जनजागृती पोस्टर्सचे विमोचन

0
618

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा:-भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा कॅच द रेन अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. कॅच द रेन अभियाना संदर्भातील जनजागृती पोस्टर्स चे विमोचन जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्याहस्ते 26 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथे करण्यात आले. या प्रसंगी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजयसिंग राजपूत व क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जतन करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे श्री. डागर यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here