सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
शिंदी येथील बागायतदार तथा सरपंच विनोद खरात यांच्या डाळिंबाची चर्चा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये असते कोरडवाहू जमिनीवर त्यांनी 50डाळींबाचे लाखापर्यंत उत्पन्न घेतलेले आहे !त्यांचे डाळिंब बांगलादेश मध्ये निर्यात होत असतात !अनेक लोक त्यांच्या डाळिंबाच्या बागेची पाहणी करून जातात !असेच आज 21 नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर .सी .पी .जायभाये .तसेच त्यांच्या सोबत असलेले कृषी विभागाचे डॉक्टर बिपिन राठोड हवामान निरीक्षक कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांचे अनिल जाधव !यांनी संपूर्ण डाळिंब बागेची तसेच पेरू लागवडीची पाहणी केली व आणखी उपाययोजना सुचवल्या यावेळी कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे ‘शरद खरात . बागायतदार तथा सरपंच विनोद खरात ‘गजानन भांड अजय खंडागळे बद्री वायाळ मधुकर खरात ।सचिन खंडारे ‘आधी शेतकरी या वेळी उपस्थित होते ‘यावेळी डॉक्टर जायभाये व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतातील डाळिंब बागेची असलेली देखभाल तसेच पेरूच्या बागाची पाहणी केली !