कुसुमतेल येथे झापास लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू सुमारे दिड लाखाचे नुकसान

सचिन पगारे नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यात कुसूमतेल येथे मंगळवारी दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झापेस आग लागल्याने हरी रामा वाजे (वय ७२ वर्ष) या वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला, या आगीमुळे सुमारे दिडलाखाचे नुकसान झाले. सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
नांदगाव तालुक्यातील कुसुमतेल येथील मयत हरी वाजे गट नंबर ९१ या शेतातील राहण्यासाठी बनविलेल्या झापेस मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली असताना त्यांना वृध्दपकाळाच्या अशक्तपणामुळे खाटेवरुन उठता आले नसल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या शेतातील साठवलेला ३० क्विंटल कापूस,१० बाजरीची पोते आणि संसारोपयोगी वस्तू असे एकूण १ लाख ५३ हजार रुपयांची नुकसान झाली असल्याचा येथील तलाठी भेंडाळे यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले. सदर घटना घडली त्यावेळी मयत वाजे यांच्या पत्नी सकुबाई आणि मुलाची पंधरा वर्षाची मुलगी दिड किलोमीटर अंतरावर शेतात कापूस वेचनीसाठी गेलेल्या होत्या तर मुलगा भावडू आणि सुन इंदूबाई हे दोन मुलांना घेऊन दौंड सहकारी साखर कारखाना येथे उस तोडनीसाठी गेलेले होते.सदर आग लागलेल्या झापेने सोबतच शेजारी असलेल्या बाळू महादू मधे यांच्या झापालाही आगीचे भक्ष बनवले त्यात धान्याचे पूर्ण नुकसान झाले.
सदर अग्नितांडवाची माहिती समजताच येथील पोलीस पाटील अशोक पाटील,भय्यासाहेब धिवर, संजय गवांडे, अक्षय धिवर,गोकुळ चव्हाण यांच्यासह नागरिकांनी तात्काळ शेजारील शेतातील विहिरीवरुन पाईपलाईन करुन पाणी आणून आग विझवली .सदर दुर्घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी. सुरवडकर, पोलीस हवालदार रमेश पवार, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, वाय एस.भेंडाळे, ग्रामसेवक पुरानीक यांनी पंचनामा करुन नागरिकांच्या सहकार्याने वाजे यांचे शव उत्तरीय तपासणी करुन आणले त्यानंतर वाजे कुटुंबियांकडून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नांदगांव तालूका प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी वाजे कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना मदतीचे आश्‍वासन दिले आहे.

Leave a Comment