कुवरदेव येथील वनामधून अवैधरित्या गोंध तस्करी करताना 3 आरोपी अटकेत तर 6 जण फरार.आरोपीजवळुन 21 हजार रुपयांचा सलाई गोंद जप्त…

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद वनविभागामार्फत जामोद येथील राखीव वनपरिक्षेत्रातील कुवरदेव येथील वनातून अवैध रित्या सलाई गोंद काढून वाहतूक करणाऱ्या आरोपी क्रमांक 1 कृष्णा तुळशीराम बारकल वय 21 वर्षे राहणार कुंवरदेव तालुका जळगाव जामोद आरोपी क्रमांक 2 अनिल सुकलाल जमरा वय 21 वर्षे राहणार कुंवरदेव तालुका जळगाव जामोद आरोपी क्रमांक तीन कैलास राजू वय 19 वर्षे राहणार कुंवरदेव तालुका जळगाव जामोद यांना वन विभागाने अटक केली तर इतर 6आरोपी फरार आहे अटक केलेल्या आरोपीकडून 210 किलो सलाई गोंद जप्त केलेला असून त्याची किंमत 21 हजार रुपये आहे सदर आरोपीवर वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1 )अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच त्यांना आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथील न्यायालयामध्ये उपस्थित केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Leave a Comment