आमगाव,दि.27ःतालुक्यातील अंजोरा रामाटोला परिसरातील मुख्य कालव्यात 65 वर्षीय महिलेचा मृतदेह Deadbody found 26 मार्च शनिवारला आढळला असून तेजनबाई दाजी वरखडे रा. रामाटोला असे मृतकाचे नाव आहे.पोलीस सूत्रात्राच्या माहितीनुसार मृतक ही काल रात्री आपल्या पतीसोबत लग्नसमारंभात जवळील कवडी या गावात गेले होते. पण लग्नसमारंभ आटोपल्यानंतर मृतका ने आपल्या पतीला म्हटले की तुम्ही गावाला जा मी नंतर गावातील बायांसोबत येतो पण ती रात्री घरी आली नाही,तेव्हा मृतकाच्या पतीने इकडे तिकडे शोधाशोध केली पण ती दिसली नाही शेवटी अंजोरा गावातील नागरिकांना अंजोरा रामाटोला परिसरातील एका मुख्य कालव्यात तिच्या मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला तेव्हा नागरिकांनी त्याची माहिती स्थानिक पोलिस पाटलांना दिली.पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन आमगावला माहिती दिल्यानंतर आमगाव पोलिस घटनास्थळावर पोचून कालव्यातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून शविच्छेदनना करिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठविले.पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार एच.सी.रहांगडाले व कोरोंडे करीत आहे.