कार्यकारी अभियंता बेबंळा प्रकल्प विभाग यवतमाळ येथे घुईखेड वासीयांचे आमरण उपोषण

 

 

घुईखेड येथील अनुसूचित जाती बौध्द व वंचित वहुजन समाजातील लोकांना त्यांच्या सुटलेल्या अतिक्रमण व अतिरिक्त बांधकाम केलेल्या घरांचा मोबदला देण्यात यावा या प्रलंबित न्याय मागणीची पुर्तता करण्यात यावी. या करीता सामाजिक कार्यकर्ते आयु.अनिल आर वरघट घुईखेड (अध्यक्ष बेबंळा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति अमरावती जिल्हा) यांचे कुशल नेतृत्वात सोमवार दि 22/3/2021 ला सकाळी 10,30 वाजता पासुन कार्यकारी अभियंता बेबळा प्रकल्प विभाग यवतमाळ* यांच्या कार्यालया समोर  आमरण उपोषण  करण्यात आले.
या आमरण उपोषणात सहभागी असलेले खालील अतिक्रमण धारक कार्यकर्ते सर्वश्री किशोर नरगळे, दुर्योधन धाबर्डे, प्रेमदास वरघट, नागोराव डांगे, प्रकाश नाना वरघट, नारायण वरघट, नितीन वरघट, रमेश कवडू धाबर्डे, सुनिल नरगळे, पवन अशोक वरघट, सतिश मारोती मेश्राम, संदिप भालचंद्र गजघाटे ,अमोल देविदास शंभरकर, पदमाकर गजघाटे, दिनेश वरघट, कवडू चद्रभान राऊत, गजानन गिरी, सचिन किसन वरघट, प्रविन रंगारी, विलास मारोतराव मेश्राम, तेजस भिमराव मेश्राम, राजेश न्यानेश्वर वानखडे, आनंद वानखडे प्रविन ना वरघट, नरेश भानुदास खंडारे, कपिल श्रीधर मेश्राम, बजरंग भगवान शिंदे,सुरेश नवघरे,
आदी अतिक्रमण धारक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.

Leave a Comment