सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
केंद्रीय मंत्रालयाने सिमेंट काँग्रेसचे चांगले रस्ते केले की जेणेकरून खड्डे असलेल्या रस्त्यावरून अपघात होणार नाहीत परंतु चांगले रस्ते झाल्यानंतर गाडीचा वेगही वाढला आहे याचा प्रत्यय होणाऱ्या अपघातातून दिसून येत आहे !दिनांक 30 नोव्हेंबर रोजी चिखली ते मेहकर मार्गावरील लव्हाळा येथील उड्डाणपुलाजवळ साखळी खुर्द येथील वाठोरे कुटुंबीय एम एच 24 व्ही 84 22 या क्रमांकाच्या कारणे काही कामानिमित्त पहाटे परभणी कडे जायला निघाले होते !सकाळी सहा वाजता लवळा जवळील उड्डाणपुलाजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाजवळील रस्त्याच्या बाजूने असलेल्या एका शेतात उलटली ‘ज्या अपघातात सतपाल वाठोरे वय 46 वर्ष हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी लताबाई वाठोरे वय 36 वर्ष व त्यांची आई मालताबाई वाठोरे वय 65 वर्ष आणि कार चालक राजू काजणे हे तिघे जण गंभीर जखमी झाले !या या अपघाताची माहिती मिळताच साखरखेर्डा येथील आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी वर प्राथमिक उपचार करून त्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले !या अपघातामुळे साखळी खुर्द येथील वाठोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे व गावात हळहळ व्यक्त होत आहे !पुढील तपास साखरखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश चव्हाण करीत आहेत !तरी लोकांनी रस्ता चांगला आहे म्हणून गाडीचा वेग वाढू नये असे आव्हान जाणकार व्यक्त करत आहेत !