कापसाला चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान-आमदार राजेश एकडे

 

सुनील पवार नांदुरा

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजेश एकडे यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा,बालाजी जिनिंग व राठी जिनिंग नांदुरा येथे काटापूजन करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून सी.सी.आय.च्या कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.असे मत आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले.सी.सी.आय.
च्या कापूस खरेदी शुभारंभ करिता नांदुरा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.पदमभाऊ पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य श्री.वसंतरावभाऊ भोजने,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. मोहनभाऊ पाटील,जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेशभाऊ पाऊलझगडे, डॉ.प्रदीप हेलगे
तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.अतुल पाटील,श्री. आकाश वतपाळ,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री. पुरूषोत्तम झाल्टे, काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष श्री.सचिन पाटील, श्री.प्रशांत देशमुख, युवासेनेचे श्री.ईश्वर पांडव,सहाय्यक निबंधक श्री.महेश कृपलानी,सी.सी.आय.श्री.नितीन भरणे, श्री.सतीश देशमुख, श्री.विठ्ठलभाऊ कोठारी,अँड.राठी,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री.संजय पाटील व कापूस उत्पादक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Comment