कन्हैय्या नगर समोरील नदीवरील पुलासह १४०० मीटर लांबीचा व मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्याचा प्रश्न सुटणार -केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे

 

प्रतिनिधी:(जालना)मागील भाजपा सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी केंद्र शासनाकडे प्रयत्न करून जालना ते चिखली पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट मध्ये बांधकाम करणेसाठी रु.५०६ कोटी मंजूर केले व काम पूर्णत्वास आले आहे.परंतु जालना शहरातील कन्हैया नगर येथील नदीवरील पुलासह १४०० मीटर लांबीचा रस्ता अद्यापही वन विभागाच्या परवानगी मुळे अपूर्ण आहे.मागील महाविकास आघाडी शासनाने आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने हा रस्ता आज मृत्यूचा सापळा बनला आहे.या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून अनेक एक्सीडेंट ही झाले आहेत,त्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे.आज दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी जिल्हाधिकारी,जालना यांचे दालनामध्ये वनविभागाचे अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व सदरील रस्त्याचे कंत्राटदार यांच्या समवेत बैठक घेतली.या बैठकीत केंद्र शासनाचे वनविभागाचे नागपूर येथील एकात्मिक क्षेत्रीय अधिकारी,मुख्य वन संरक्षक अधिकारी,नागपूर,उप वन संरक्षक अधिकारी,औरंगाबाद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भाग घेतला तर जिल्हाधिकारी, जालना,राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता,पीडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता सहा वनसंरक्षक प्रादेशिक वन विभाग, जालना हे प्रत्यक्ष मिटींगला हजर होते.यावेळी झालेल्या चर्चेमध्ये या रस्त्यावर काम करणेसाठी, रस्त्याचे रुंदीकरण करणेसाठी वन विभागाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे समजले.ना.दानवे यांनी वन विभागाचे अधिकारी यांना कडक भाषेत सूचना करून,सदर प्रस्तावास तात्काळ मंजुरी देऊन रस्त्याचे काम पूर्ण करा असे निर्देश दिले. त्यासाठी औरंगाबाद व जालना येथील वन विभागाचे सर्व संबंधित अधिकारी आजच नागपूर साठी रवाना झाले,सोमवारी प्रस्तावातील त्रुटी दुरुस्ती करणार असून,त्रुटीची दुरुस्ती होताच येत्या तीन ते चार दिवसामध्ये परवानगी मिळणार आहे.परवानगी मिळताच आठ ते दहा दिवसात प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे.केंद्रीय मंत्री ना.दानवे यांनी आज सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत कन्हैयानगर येथील रस्त्याची पाहणी केली व तेथील नागरिकांशी संवाद साधला आणि सध्या जो रस्त्याचा भाग अत्यंत खराब झाला आहे त्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना ना.दानवे यांनी कंत्राटदारास दिल्या असून,येत्या बुधवार पासून प्रत्यक्षात दुरुस्ती कामास सुरुवात होणार आहे.

Leave a Comment