लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे
एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरू करुन व सर्वसाधारण जनतेची गैरसोय दुर करा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारला असुन सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहेत. एस टी बस बंद झाल्याने सर्व सामान्य जनतेस याची झळ पोहोचत असुन बेकायदेशीर व कालबाह्य झालेली अवैधरित्या वाहनाने प्रवासी वाहतूक होत आहे.त्यामुळे अपघात होऊन काही जणांना आपल्या जिवाने मुकावे लागले आहे.तसेच सणासुदीच्या काळात व लग्नसराईत एस टी सेवा बंद झाल्यामुळे गोर गरीब जनतेची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे.यामुळे खाजगी वाहने व कालबाह्य झालेली वाहनेही रोडवर येऊन उच्छाद माजवला आहे.याबाबत मुख्यमंत्री यांनी तातडीने एस टी बस सेवा पूर्ववत सुरू करुन एस टी कर्मचाऱ्यांचे संप मोडीत काढावे व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी.असे एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी 21 फेब्रुवारी 2022 सोमवार रोजी निलंगा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे.