गजानन सोनटक्के
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:-
यावर्षी सर्व पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले १०% पिक सुद्धा हाती लागले नाही. या सर्व परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुक़सानीचे अध्यापही कुठलाच मोबदला मिळाला नाही सोबतच नजरअंदाज व सुधारित आनेवारी ५० पैश्यांच्या वर काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळुन शेतकऱ्यांना पिकवीम्या पासून वंचित ठेवन्याचा प्रयत्न केला जात आहे.. या संदर्भात दोन वेळा मोर्चा व निवेदनाच्या स्वरुपात प्रशासनाला जाब विचारण्याच काम मा.प्रसेनजीतदादा पाटिल यांच्या नेतृत्वात व हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केल्या गेल. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने अंतिम आनेवारीत जळगाव जामोद तालुका ५० पैश्यांच्या आत बसवन्याच आश्वासन देण्यात आलेले आहे.. तरी या निगरघट्ट प्रशासनाला त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी एल्गार संघटनेच्या वतीने मा.प्रसेनजीतदादा पाटिल यांच्या नेतृत्वात दिनांक २८/१२/२०२० पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याची हाक एल्गार संघटनेने दिली होती . त्याला प्रतिसाद देत हजारो शेतकर्यांनी साखळी उपोषणात सहभागी होत आनेवारी ५० पैश्यांच्या आत यावी ही मागणी प्रशासनाकडे रेटून धरली.प्रसेनजीत पाटिल यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत जो पर्यंत चालू आर्थिक हंगामाची आनेवारी ५० पैष्याच्या आत आल्याचे घोषित होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली. शेवटी प्रशासनाने मागणी मान्य करत जळगाव जामोद तालुक्याची आनेवारी ३७ पैशे काढल्याचे पत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांना दिले. यावेळी विजय पोहनकार,प्रशांत डिक्कर,बंडू पाटिल वाघ, बाळु पाटिल डिवरे,अजहर देशमुख,विजय तायड़े, ईमरान खान, गणेश मानखैर, सुरेश पाचपोर, राजू पाटिल,आशिष वायझोड़े, संतोष भारसाकळे,अरुण दाभाड़े, समिर आर्यन, निजाम राज, सिद्धार्थ हेलोडे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. हा शेतकरी एकजुटीचा विजय असल्याच्या भावना यावेळी प्रसेनजीत पाटिल यांनी व्यक्त केल्या.