मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण
(कोल्हापूर) : एक स्पोट व सर्व संसार उध्वस्त गॅस हा स्फोटक पदार्थ असल्याचे माहीत असूनही निष्काळजीपणाने रेग्युलेटर सुरू ठेवल्याने उडालेल्या भडक्यात दोघांच्या मृत्यूस आणि दोघांच्या गंभीर जखमी होण्याला कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांत एकावर गुन्हा दाखल केला. उमेश वसंत मोहिते (वय ३५, मांडेकर गल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, ११ ऑगस्टला मोहिते याच्या घरी सत्यनारायण पूजा व आंबील कार्यक्रम होता. यानिमित्त मोहिते याने शेजारच्या दीपक बामणे यांच्या घरातील सोप्यात जेवण केले होते. त्यासाठी गॅस शेगड्या आणि सिलिंडर आणले होते. जेवण केल्यानंतर मोहिते याने भांडी, शेगडी आणि सिलिंडर तेथेच ठेवले.
रात्री जेवण गरम केले. त्यानंतर मोहिते याने रेग्युलेटर बंद केले नव्हते. त्याच दिवशी रात्री गॅस गळती होऊन पणतीमुळे गॅसचा भडका उडाला. त्यात दीपक बामणे (वय ४९), पत्नी सौ. संगीता, मुली उत्कर्षा आणि आरती हे चौघेही गंभीर भाजले. त्यांना उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना आधी दीपक यांचा तर, काही दिवसांनी उत्कर्षाचा मृत्यू झाला. संगीता व आरतीवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. गॅस हा स्फोटक व ज्वलनशील असल्याची कल्पना असूनही त्याच्या हाताळणीत हयगय आणि निष्काळजीपणा करून दोघांच्या मृत्यूस आणि गंभीर जखमीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सरकारतर्फे पोलिस हवालदार पी. बी. गोजारे यांनी संशयीत मोहिते याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद करीत आहेत.
दरम्यान, गॅसच्या भडक्यात पती-पत्नीसह दोन मुली भाजून गंभीर जखमी झाल्या. पती आणि मोठ्या मुलीचा मृत्यू झाला. पत्नीचीही प्रकृती गंभीर आहे. पाच वर्षांची मुलगी ३० टक्के भाजली आहे. पत्नी व मुलगी घरीच आहेत. आर्थिक स्थितीअभावी पुढील उपचाराला अडचण आल्याचे कळताच तपासकामी कुटुंबाच्या घरी गेलेली खाकी वर्दी गहिवरली अन् त्या मुलीला वर्गणी काढून खासगी दवाखान्यात दाखल केले.
हे पण वाचा – ह्रदयद्रावक! नव्या दुचाकीचे पासिंग होण्याआधीच काळाने घातला घाला
गडहिंग्लज पोलिसांनी दाखवलेली माणुसकी प्रेरणादायी आहे. मांडेकर गल्लीतील दीपक बामणे यांच्या घरी ११ ऑगस्टला गॅसचा भडका उडाला. त्यात स्वत: दीपक, पत्नी संगीता आणि उत्कर्षा व आरती या दोन मुली भाजून जखमी झाल्या. उपचार सुरू असताना दीपक व उत्कर्षाचा मृत्यू झाला. संगीता व आरतीवर उपचार सुरू होते.
हे पण वाचा – धगधगती स्मशानभूमी ; चोवीस तासात तब्बल शंभर अंत्यसंस्कार
दरम्यान, तपासकामी गडहिंग्लजचे पोलिस बामणे कुटुंबीयांच्या घरी गेले. संगीता व आरती यांची स्थिती पाहून त्यांनाही गहिवरून आले. त्यांनी मुलीच्या उपचारासाठी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी काढून आरतीला दवाखान्यात दाखल केले आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहायक निरीक्षक दिनेश काशीद यांच्यासह सहकाऱ्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.