गेल्या 17 ऑगस्ट 2020 रोजी मा.अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या दालनात खडकपूर्णा प्रकल्प विभाग,देऊळगाव राजा अंतर्गत गांगलगाव वितरीकेवरील संबंधित कास्तकार यांच्या मागण्या विभागीय स्तरावरुन पूर्ण न झाल्यामुळे मा.अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ऋषिकेश म्हस्के व संबंधित कास्तकार यांच्यासोबत दुपारी 1:00 वाजेपासून तर रात्रीच्या 11:00 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.
संबंधित कास्तकार यांच्या मागण्या आम्ही विविध कालावधीत पूर्ण करून असे आश्वासन/करावयाची कार्यवाही पत्र मा.अधीक्षक अभियंता यांनी दिले व आंदोलन माघे घेऊन सांगता करण्यात आली
त्यानंतर 4 महिने होऊन सुद्धा हे काम पूर्ण झाले नाही .
त्या कामाचा पाठपुरावा करण्यास गेल्या नंतर मा.अधीक्षक अभियंता उडवा उडवी चे उत्तर देतात…
हे माझं काम नव्हे ते कार्यकारी अभियंता यांचे कार्य आहे मला काय एवढं काम आहे का आमच्याकडे मनुष्यबळ नाही
त्यानंतर सहायक अभियंता यांना विचारल्या नंतर तेही उडवा उडवीचे उत्तर देतात ते प्रकरण पाठवले तुमचे काम झाले मी प्रत्यक्षस्थळी येऊन बघितले परिस्थिती अशी आहे की हे संबधीत अधिकारी कदापिही प्रत्यक्षस्थळी आलेले नाही.
नुसता खोटेपणा करून शेतकऱ्यांनाचा आवाज दाबतात आणि कमी आवाजात बोला आवाज वाढू नका असा अश्या धमक्या शेतकऱ्यांना देतात.
दिलेल्या पत्राची व काय कामे केली यांचा जाब विचारण्यासाठी काल संबंधित कास्तकार गेले असता दुपारी 3 वाजेपासून तर 7 :33 वाजेपर्यंत सहायक अभियंता खडकपूर्णा प्रकल्प चिखली यांच्या कार्यलयात ठिय्या देऊन होते.
त्यानंतर संबंधित अधिकारी कोणत्याही मुद्याला थारा लागू देत नव्हेत.
सौजन्याने बोला माझे काम नाही ते मी वरिष्ठांना कस बोलू असे म्हणून तेही शेतकऱ्यांची दिशाभूल करत होते.
त्यांनतर ऋषिकेश म्हस्के आक्रमक होऊन मुद्यांवर संपूर्ण चर्चा करून सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे नाहीतर आम्ही येथून उठत नाही अशी भूमिका घेतली.
त्यानंतर सर्व मुद्यांवर लेखी आश्वासन दिले व आंदोलन माघे घेण्यात आले.
दिलेल्या आश्वासनाची पूर्तता विहित कालावधीत झाली नसल्यास त्रिव आक्रमक भूमिका घेऊन पुढील आंदोलन करण्यात येईल.
यावेळी यावेळी ऋषीकेश बबनराव म्हस्के,गणेश मदनराव म्हस्के व नितीन मधुकर म्हस्के,आव्हाड साहेब,चांदवडकर साहेब,देशमुख साहेब व इतर अधिकारी यांच्यासह राजेंद्र गंगाराम म्हस्के,ज्ञानेश्वर अशोक म्हस्के,महादू कुंडलिक म्हस्के,गणेश दिनकर सावळे,अमोल रामकृष्ण म्हस्के,विलास पुंडलिक म्हस्के,शिवाजी पुंडलिक म्हस्के,प्रदीप शंकर खरात,एकनाथ दत्तू सोळंकी हे प्रामुख्याने हजर होते