हिंगणघाट :- मलक नईम महसूल दिनाच्या दिवशी हिंगणघाट शहरातील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाली यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणुन प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी 18 व 19 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात उल्लेखनीय कामगिरी करत हिंगणघाट उपविभागातील लोकांना पूर परिस्थितीत रेस्क्यू करत सुरक्षित स्थळी हलविले त्यामुळे तालुक्यात कुठलीही जिवित हानी झाली नाही,त्याचबरोबर अनेक कामात उल्लेखनीय कामगिरी करत लोकांच्या प्रश्नांना अल्पवेळात न्याय देत लोकांची मने जिंकली.
याचा सन्मान म्हणून महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्धा यांच्या द्वारे उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रमाणपत्र देत सन्मान करण्यात आला आहे हिंगणघाट उपविभागीय अधिकारी यांना मिळालेल्या या सन्माना बद्दल अनेक स्तरातुन शुभेच्छा दिल्या जात आहे.
हा सन्मान सोहळा जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारीसह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.