काँग्रेसचे न.प मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : हा औद्योगिक शहर असून याठिकाणी एसीसी, लोयड्स मेंटल्स,कोळसा खाणी,गुप्ता कोल वॉशरीज सारखे अनेक उद्योग असून
या उद्योगांना शहरात प्रत्येकी दोन वॉटर टॅंकरने टंचाईग्रस्त भागात मोफत पाणी पुरवठा करण्यास बाध्य करावे अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट निवेदनातुन केली आहे.
शहरात पाण्याची भीषण टंचाई असून शहरातील लुम्बिनी नगर,बैरम बाबा नगर,राम नगर,शिव नगर,यासह अन्य भागात नागरिकांच्या नळाला पाणीच येत नाही.
पाण्यासाठी भीषण उन्हात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या दोन खाजगी टॅंकरने संपूर्ण शहरात मागेल त्याला मोफत पाणी पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.
मात्र भीषण उन्हाळ्यात वाढत्या गर्मी पासून रक्षणासाठी कूलर शुरू करण्यात येते यामुळे पाण्याची प्रचंड मागणी होत असल्याने दोन टॅंकर हे अपुरे पडत आहे.
करिता उद्योगांच्या सामाजिक निधीतून शहरात पाणी पुरवठा करावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,रोशन दंतलवार ,इर्शाद कुरेशी,अनुप भंडारी, आकाश चिलका,रफिक शेख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते