इंद्रायणी तीरावर “विठू माझा लेकुरवाळा” हे भिंतचित्राचे लोकार्पण

 

पुणे- आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकल्पनेतुन आणि शिवतेज मित्र मंडळ यांच्या सौजन्याने पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्त निवासाच्या भिंतीवर विठू माझा लेकुरवाळा हे भिंतचित्र साकरण्यात आले असून या चित्राचे लोकार्पण सोहळा श्री.सदगुरु मनोहर मामा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख अॅड.विकास ढगे पाटील,आळंदी पोलिस स्टेशनचे ज्ञानेश्वर साबळे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,नगरसेवक प्रशांत कुर्‍हाडे,शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंद मुंगसे,माजी नगरसेवक रमेश गोगावले तसेच शिवतेज मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि मामांचे भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या भिंतीवरील चित्रात श्री विठ्ठल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वासुदेव, वारकरी विणेकरी, तुळसधारी वारकरी महिला प्रतिनिधी साकरण्यात आले आहे हे चित्र अक्षय भोसले, धीरज पोटफडे, मोहन पाटोळे, नवनाथ कोरके, सुजल ओव्हाळ आणि माणिक तोरवार या कलाकारांनी साकारले आहे.

Leave a Comment