आ. समीर कुणावार यांचे निधीतुन ७ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 

हिंगणघाट दि.19 जुलैकेन्द्राने राज्यात दिलेल्या ६ हजार ५०० कोटि रूपयाच्या लसीमुळे राज्याचे वाचलेली रक्कम आरोग्यासाठीच उपयोगात आणली पाहिजे,केंद्र सरकारमधे स्व.अटलजी पंतप्रधान असतांना आरोग्य हा राज्याचा विषय असतांना राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या अनेक योजना सुरु करण्यात आल्याची माहितीही रुग्णवाहिका लोकार्पण समारोहप्रसंगी माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक विकास निधीतुन देण्यात आलेल्या सात रुग्णवाहिकांचे लोकार्पणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आले.
यावेळी त्यांनी लोकाभिमुख कार्याची स्तुती केली,समिर कुणावारांचे रूपाने त्यांनी मतदारसंघाला कार्यसम्राट आमदार लाभले असल्याचा उल्लेख करीत त्यांनी कुणावार यांचे कौतुक केले.
आज दिनांक १८ जुलै रोजी स्थानिक निखाडे शभागृह येथे उपरोक्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी भाजपाचे राज्य सचिव राजेश बकाने, हिंगणघाट नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसतांनी,जि प सभापती माधव चंदनखेडे,पंचायत समिती सभापती सुरेखा टिपले,सौ शारदा आंबटकर,सिंदी येथील नगराध्यक्षा सौ बबिता तुमाणे,समुद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गजानन राऊत,भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष भुपेंद्र शहाणे,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष नितीन मडावी इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान राज्य सचिव राजेश बकाने,नागराध्यक्ष प्रेम बसंतांनी,जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे,हिंगणघाट तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,समुद्रपुर तालुकाध्यक्ष संजय डेहणे, राकेश शर्मा इत्यादींनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्थानिक नगरसेवक, उपस्थित जि प सदस्य,पंचायत समिती सदस्य,आरोग्य विभागाचे अधिकारी व भाजपा कार्यकर्ते यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले
सदर रुग्णवाहिका उपजिल्हारुग्णालय हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय तसेच समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी,गिरड व प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदी (रेल्वे),हमदापूर,हिंगणघाट तालुक्यातील पोहणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे देण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात रुग्णांची मोठी हेळसांड झाली रुग्णवाहिकेअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला यावेळी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद नजरे समोर ठेऊन आपल्या स्थानीक आमदार निधीतून १कोटी २७लक्ष रुपये दिल्याचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले,या वेळी पुढाकार घेऊन डाँ. चाचारकर,डॉ.माधुरी कुचेवार तसेच आरोग्यविभागाचे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याने हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून अनेकांचे प्राण वाचविता आले याचे समाधान असल्याचे कुणावार यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे यांनी केले व आभार प्रदर्शन शहराध्यक्ष आशिष पर्बत यांनी केले.

Leave a Comment