इस्माईल शेखशेगाव शहर प्रतिनिधी
खामगाव: आषाढी एकादशी उत्सवानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सोडण्यात येणाऱ्या खामगाव पंढरपूर या स्पेशल ट्रेनच्या खामगाव येथून चार फेऱ्या सोडण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्राकडे करण्यात आली आहे.
याबाबत आज 26 मे रोजी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे स्टेशन प्रबंधक अडकणे साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी आषाढी एकादशी उत्सवानिमित्त खामगाव येथून स्पेशल पंढरपूर यात्रा ट्रेन सोडण्यात येते रेल्वेचा पंढरपूरचा प्रवास हा कमी भाड्याने होत असल्याने व सुविधा जनक प्रवास या कारणामुळे शेकडोच्या संख्येने भाविक या स्पेशल ट्रेन ने पंढरपूर वारी यात्रेला जात असतात मात्र खामगाव येथून खामगाव पंढरपूर या स्पेशल ट्रेनच्या दोनच फेऱ्या सोडण्यात येत
असल्यामुळे अनेक भाविक या ट्रेनने पंढरपूरला जाण्यापासून वंचित राहतात त्यामुळे त्यांना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास सहन करून पंढरपूरला जावे लागते रेल्वे प्रशासनाने या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन या वर्षी खामगाव येथून पंढरपूर साठी चार फेऱ्या सोडाव्यात.
अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटने कडून करण्यात आली आहे या निवेदनावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा राष्ट्रीय उपाध्यक्ष लीनाताई पाचबोले राष्ट्रीय संघटक रूपाली वानखडे , विभागीय सरचिटणीस ज्योती बावस्कार, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना अकोला जिल्हा सचिव फुलाबाई राठोड,, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष किरण लंगोटे ,शेगाव तालुका अध्यक्ष सिद्धमती निखाळे, छाया देशमुख, राष्ट्रीय एकता रेल्वे संघटना अध्यक्ष नंद गोपाल पांडे, पत्रकार राजकुमार व्यास सामाजिक कार्यकर्ते ललित पांडे आदी विविध कार्यकर्ते उपस्थित होते