राजूरेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
( चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या वाढदिवसानिमित् कोरोना काळात दिवसरात्र जीवाची कुटुंबाची तमा न बाळगता सेवा देणाऱ्या आशा वर्कर,आंगणवाडी सेविका,मददनीस व शहराची घाण आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या नगरपरिषदेच्या सफाईकर्मी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येत असून
सदर सत्कार पालकमंत्री विजय वड्डेटीवार,ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेजी यांच्या हस्ते करण्यात येत असून अपंग बांधवाला तीन चाकी सायकल व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमात नागरिकांनी तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व आजी – माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले आहे.