आरोग्य हेच आदर्श गावा साठी कानमंत्र !बीग्रेडिअर माजी खासदार सुधीरजी सावंत यांचे प्रतिपादन ! ..शिंदी येथे बिग्रेडिअर सुधीरजी सावंत यांची भेट !

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

आरोग्य हीच समृद्धी तथा आदर्श गावासाठी सर्वात मोठे कानमंत्र आहे ‘आरोग्य प्रत्येकाने जपली पाहिजे ‘असे मत माजी खासदार तथा माजी सैनिक फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष बिग्रेडिअर सुधीरजी सावंत यांनी दिनांक 20 मार्च रोजी शिंदी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात केले,यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व्यायाम केला पाहिजे महिलांनी सुद्धा विविध प्रकारचे खेळ खेळले पाहिजे बचत गटांच्या महिलांनी छोटेखानी उद्योग उभारून आपल्या गावातच उद्योगाची उभारणी केली पाहिजे ‘असेही त्यांनी यावेळी सांगितले ‘यावेळी मंचकावर बागायतदार निवृत्ती खरात सरपंच सौ अर्चना ताई खरात उपस्थित होते यावेळी माजी सैनिक विदर्भ अध्यक्ष तथा शिंदी येथील ग्रामसेवक माननीय अर्जुन जी गवई यांनी शिंदी गाव हे आदर्श गाव झाले पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असून माननीय साहेबांनी शिंदी गावासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी अर्जुन गवई यांनी केली ‘यावेळी शिंदे येथील सभागृहांमध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणाने नियम पाळण्यात आले ।प्रत्येकाने तोंडाला माक्स बांधले होते ‘यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी केली ‘तर आभार गजानन भांड यांनी मानले ‘या कार्यक्रमासाठी माजी सैनिक केवळ गिरी महाराज ‘ काशिनाथ बुरुकुल ‘ बंगाळे ‘भगवान गवई ‘भाऊराव चव्हाण .आत्माराम खिल्लारे .तसेच ‘बचत गट अध्यक्ष स्वाती मार्के ‘रेखा पवार ‘सुनील खंडारे विशाल खंडागळे ‘अनिल बंगाळे गवळी ‘ग्रामपंचायत सदस्य श्री सखाराम खंडागळे ।ज्ञानेश्वर खरात ‘गजानन खरात ‘गणेश तोडे ‘विनोद वैद्य ‘प्रयोगशील शेतकरी निवृत्ती खरात ‘सरपंच पती विनोद खरात ‘आधी आजी-माजी सैनिक या ठिकाणी हजर होते ‘यानंतर मा .सुधीरजी सावंत यांनी शिंदी गावची फेरफटका मारुन पाहणी केली ‘

Leave a Comment