आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले कुलूप कर्मचारी झाले बंदिस्त

 

गजानन सोनटक्के
प्रतिनिधी जळगाव जामोद

दिनांक 5 फेब्रुवारी रोजी डॉक्टर आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वात शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी रास्तारोको करीत महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा दिला व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकार द्वारे लॉक डाऊन च्या काळात वीज देयके कमी करण्यात येतील व 100 युनिट पर्यंतचे वीज देयके माफ करण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती परंतु आता वीज देयके माफ तर केलीच नाहीत उलट वीज देयके भरावे लागतील असे ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केले व राज्यातील 78 लाख वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू झाले आहे याविरोधात आज 5 फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयाला माजी मंत्री व आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कुलूप ठोकले व कर्मचाऱ्यांना बंदिस्त केले तसेच आमदार कुटे म्हणाले आमचे लढाई सरकारच्या विरोधात आहे परंतु कर्मचाऱ्यांनी सरकारच्या दबावाखाली न येता नागरिकांना सहकार्य करावे व वीज कनेक्शन कापण्यास जाऊ नये तसे केल्यास गाठ भारतीय जनता पार्टी सोबत आहे व त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी महावितरण व शासन जबाबदार राहील असा इशारा सुद्धा यावेळी संजय कुटे यांनी दिला डॉक्टर कुटे म्हणाले या लॉक डाउन च्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला चार महिने काम नव्हते कोणतीही आवक नसताना तरुणांच्या नोकऱ्या गेल्या अशा काळात विज बिल वाढवून एक प्रकारे कहरच केला व विविध प्रकारचे त्यावर करवाढ केली ऊर्जा मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची जनतेने कुठल्याही प्रकारची मागणी केले नसताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी करोणा च्या काळातील वीज बिल माफ करू अशी घोषणा केली त्यांनीच दिलेले आश्वासन, घोषणा ते पूर्ण करत नाहीत म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे ही घोषणा फक्त मोठेपणा दाखवण्यासाठी केली असा आरोप सुद्धा यावेळी संजय कुटे यांनी केला तसेच पुढे म्हणाले अन्य प्रदेशात आलेला विज बिलांवर पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे आणि यामुळे जनता सरकार विरोधात वेगळ्या स्वरूपात रोष व्यक्त करत आहे यावेळी नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, , तसेच शेकडो वीज ग्राहक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment