आपण आपल्या क्षेत्रात केलेल्या प्रामाणिकपणाचे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते – अभयसिंह

 

मित्रांनो मी गेली ७ वर्षे झाली शेळीपालन या व्यवसायात अगदी जिव्हाळ्याने काम करत आहे.माझं शिक्षणही भरपूर झालेले आहे.(M.A.,M.Ed.) शिक्षणाचा उल्लेख मुद्दामहून केला कारण शिक्षित व्यक्ती चांगली नियोजन बद्ध शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय करू शकतो.आणि म्हणुनच म्हणतो शेतकरी तरुणाने उच्च शिक्षित होऊन शेती करावी.
मित्रांनो शेतीला जिवंत ठेवण्यासाठी शेतीपूरक व्यवसायात पाऊल ठेवणे ही काळाची गरज आहे म्हटल्यापेक्षा विदर्भातील शेतकऱ्याची गरज आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.म्हणूनच मी शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय करण्याचे ठरविले आणि त्यात स्वतःला गेली ७ वर्षे झोकून दिले.आणि अनेक खाचखळगे खात(बकऱ्यांचे मरतुकीला तोंड,त्यांचं संपूर्ण लसीकरण ते बाजारात जाऊन विक्री)आज त्या व्यवसायात successfully stable झालो.आणि म्हणूनच मला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक मोठं मोठ्या नामवंत कृषी प्रदर्शन्या मध्यें शेळीपालन या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणूंन निमंत्रित केल जाऊ लागले.विशेष म्हणजे आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या ‘ऍग्रो व्हिजन’ या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनात गेली पाच वर्षे शेळीपालन या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणुन आमंत्रित असतो.त्याच बरोबर पशुसंवर्धन विभागाचे कार्यक्रम, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यक्रम, विविध शेतकरी मेळावे,विविध महाविद्यालयात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याविषयावर मार्गदर्शक, कृषी विभागाचे कार्यक्रमात सुद्धा प्रमुख मार्गदर्शक म्हणून गेलो.
आणि आता दिनांक ३१/०७/२०२१ ला नेमकेच माझी महाराष्ट्र मत्स्य व पशु विज्ञान विद्यापीठ नागपूर द्वारा संचालित , स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्था अकोला द्वारा संकल्पित ‘बेरारी शेळी पैदासकार संघटनेच्या’ अध्यक्ष पदी एकमताने बिनविरोध निवड झाली.या अंतर्गत देशात २८व्या क्रमांकावर रजिस्टर झालेल्या आणि विशेष म्हणजे आपल्या विदर्भाची उत्पत्ती असलेल्या बेरारी शेळी च्या संवर्धनासाठी, तिच्या प्रजातीचा आणखी नावलौकिक करण्यासाठी निर्माण संघटनेचा मी पहिलाच अध्यक्ष झालो.मी माझ्या पदाला निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि बेरारी शेळीचा ब्रँड संपूर्ण देशभरात प्रसिध्द करेल.
माझी निवड बेरारी शेळी पैदासकारांची बैठक व चर्चासत्र या कार्यक्रमात झाली यावेळी आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री डॉ भिकाने सर सहयोगी अधिष्ठाता स्ना प प वि सं यांच्या हस्ते तर आदरणीय सजल कुलकर्णी,आदरणीय डॉ कानडखेडकर सर उपसंचालक पशु पैदास प्रक्षेत्र बोरगाव मंजू,डॉ कुरळकर सर,डॉ थोरात सर,डॉ वाघमारे सर,डॉ पावशे सर ,डॉ इंगवले सर ,डॉ पंचभाई सर, डॉ बनकर सर यांच्या उपस्थितीत झाली.यावेळी उपाध्यक्ष म्हणून कुलदीप राठोड,सचिव पदी श्री गणेश काळे,तर कोषाध्यक्ष पदी आमचे मार्गदर्शक संजयजी मालोकार,सहसचिव म्हणून अजिंक्य शहाणे तर सदस्य म्हणून डॉ निलेश थोरात, सुनील ताकवाले,राजरत्न वानखडे,श्री डाहाके,श्री गिरी इत्यादींची निवड करण्यात आली.

अभयसिंह मारोडे
9423761908

Leave a Comment