संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी गाव वसाळी येथील शिवाजी महाराज इको पार्कवर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शिवजयंती साजरी केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोजक्याच लोकांना सोबत घेऊन मास्क, शोसल डिस्टन्स चे पालन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. मागील 5 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आवरणात झाकून ठेवलेला असताना 5 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन सायन्स इको पार्क गाठून पार्कवरील शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे आवरण काढून पाण्याने स्वच्छ धुवून पूजन करून महाराजांची जयंती साजरी केली होती. आज दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी सुध्दा सकाळी 11 वा. जयंती साजरी केली. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे हार घालून पूजन केले. शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी, जय जिजाऊ जय शिवराय असे जयघोष करून परिसर दणाणून सोडला. ह्यावेळी जेष्ट पत्रकार भाऊ भोजने, नारायण ढगे, पत्रकार शेख अनिस, राजेंद्र वानखडे, धर्मेंद्र इंगळे, राजेश आमटे, दुर्गासिंग सोळंके, सत्यवरत करंगळे,संतोष चव्हाण, सोनाजी कोठे, पप्पू पठाण खुमसिंग, रामेश्वर राऊत सह आदिवासी बांधव उपस्थित होते.