आदिवासी बांधवांच्या सोबतची एक दरवर्षीची भाऊबीज

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि.13 नोव्हेंबर रोजी संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल ग्राम वसाळी येथे आदिवासी बांधवां सोबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी च्या सचिव डॉ.स्वातीताई वाकेकर यांनी भाऊबीज साजरी केली.

यावेळी ग्राम वसाळी मध्ये जेव्हा ताईची गाडी उभी राहते तेव्हा कोणाला न बोलवीता सर्वच बांधव लगेच उपस्थित राहतात व सर्व एकत्र येतात. आपली बहीण आपणास ओवळ्याला आली म्हणून आपल्या पत्नीस सुध्दा या भाऊबीज कार्यक्रमाला उपस्थित ठेवतात. त्यावेळी प्रत्येक आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य जणू भावनिक क्षणात जाते.
अश्यातच एका बांधवांना ओवळतांना तो बांधव आपसूकपणे म्हणतो ताई मागे तुम्ही निवडणूक ला पडल्या ते दुःख मनात असतांना पण दुसऱ्याच दिवशी भाऊबीज ला आल्या व आमची भाऊबीज केली. तेव्हा आदिवासी बांधवांच्या मनातील रडू ताई आपसूक सावरतात हा क्षण खरंच खूपच काही सांगून जातो.
या भाऊबीज कार्यक्रमास बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी शेला टोपी नारळ व फराळाचं देवून भाऊबीज साजरी केली.

यावेळी बालक दिनाच्या पूर्व संध्येला लहान बाल गोपालां सोबत अल्पोपहार घेतला. यावेळी बालगोपालांच्या चेहर्यावरचे हसू व मोठ्यांच्या डोळ्यातील आनंद मनाला मानसिक समाधान देवून जातात. यावेळी संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.राजुभाऊ वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.रमेश लोणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयमाल भाऊ, डॉ.संदिपजी वाकेकर, वसालीचे संरपच पती हुसैन पालकर, उपसंरपच झामसिग सुलिया, धर्मेंद्रभाऊ इंगळे, मारोती कडसकार,हिम्मतराव धांदेकर, अशोक पालकर, कपिल पालकर, रेवरसिंग सूलिया, कुमार जमरा,साजिद पठाण ,गोपाल इंगळे, पंकज तायडे ,नितीन जाधव,अमोल मानकर जूनेद शेख, प्रशांत वंडाळे तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Leave a Comment