जळगाव जामोद येथील वाडी खुर्द येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बाल दिनाचे औचित्य साधून रिपाईच्या वतीने शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या परंतु सद्यस्थितीत शिक्षण प्रवाह उच्चणाऱ्या पारधी जमातीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा म्हणून रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी नाविन्यपुर्ण उपक्रम वाडी खुर्द येथील पारधी तांड्या वरील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य ज्ञानवर्धक साहित्य यासह गुलाब पुष्प व खाऊचे वितरण करून या पारधी तांड्यावरील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी पारधी तांड्यावरील शिक्षणापासून वंचित असणारे विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना रिपाई चे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांच्यासह भास्कर भटकर अजब आगरकर अरुण शिरसाठ सतीश तायडे यांच्यासह पारधी तांड्यावरील विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.