आझाद हिंद संघटनेच्या आंदोलनाला यश, अखेर करोडो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विजय गव्हाड सह चार आरोपींना नांदुरा पोलिसांनी अखेर केले जेरबंद,!,

0
599

 

आरोपींना तीन दिवसांचा पी, सी, आर,
फसवणूक झालेल्यांनी समोर यावे.. शेख सईद, विदर्भ संपर्कप्रमुख आझाद हिंद शेतकरी संघटना.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सीमा तायडे,व निर्मला पाटील यांनी दिनाक, 21/12/2021 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे उपोषण केले होते, त्यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड,सतीशचंद्र रोठे, विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद,शेख कदिर, जिल्हा उपाध्यक्ष सौ वर्षाताई ताठरकर, यांनाही तक्रार निवेदनाच्या देन्यात आले होते. सदर विनंती निवेदनावरून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन पाठपुरावा केला. त्यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, वडनेर भोलजी येथील विजय गव्हाळ याने युवा शक्ती जागरण मंच,यासह विविध बनावट नावांनी जिल्हाभर महिला गटांची स्थापना केली. सदर गटातील महिलांना रोजगार व साहित्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले, या आमिषाला बळी पडत जिल्ह्यातील लाखो महिलांनी करोडो रुपये जमा केले होते, परंतु रोजगार आणि वस्तू, साहित्य मिळाले नसल्याने फसवणूक केल्या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलांना सोबत घेऊन आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, मोताळा, नांदुरा,शेगाव, अशा विविध पोलीस स्टेशनला विजय गव्हाळ विरोधात रीतसर एफ आय आर नोंदविन्यात आल्या. आझाद हिंद शेतकरी संघटना व आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने जिल्हाभर उपोषण आंदोलन करण्यात आले. गृह मंत्रालय पर्यंत सदर आंदोलनाची दखल घेण्यात आली त्यानुसार उच्चस्तरीय पोलिस यंत्रणा कार्यान्वित झाली.

तर जिल्ह्यात सर्वप्रथम नांदुरा पोलिस स्टेशन येथे फिर्यादी संकेत सोपान संभरे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार नांदुरा पोलिसांनी आरोपी विजय गव्हाळ,शरद इंडोले,योगेश करंकर,शिवशंकर धूसर, व अधिक एक अश्या पाच आरोपी विरुद्ध अप,क,619/2020 नुसार कलम 420/ 468//34 भा,द,वी, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना जेरबंद करण्यात आले, विजय गव्हाळ गेल्या दीड वर्षांपासून फरार होता हायकोर्टाने बेल नाकारली होती. विजय गव्हाळला जेरबंद करण्यात अखेर प्रथमता नांदुरा पोलिसांना यश प्राप्त झाले.
नांदुरा न्यायालयासमोर हजर केले असता विजय गव्हाळ ला न्यायालयाने 18/4/2022 ते 20/4/2022 पर्यंत तीन दिवसाचा पि,सी,आर, देण्यात आला. सदर गुन्ह्यात जिल्ह्यात व जिल्हा बाहेरही फसवणूक झालेल्या फिर्यादींची तर सदर गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या सहभागीदार आरोपींची संख्याही वाढू शकते. करोडो रुपयांचे घबाळ समोर येन्याची दाट शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तवली आहे.पुढील तपास नांदुरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार भूषण गावंडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी,डी,मानकर,तडवी,गायकवाड,राजपूत, निंबोलकर, वेरुळकर,हे करीत आहेत.

लाखो महिलांकडून प्रत्येकी अकराशे, दोन हजार,पाच हजार, तर काही ठिकाणी 50 हजार ,दोन लाख, पाच लाख अशीही रक्कम विविध वस्तू आणि योजनांच्या नावाखाली गंडवल्याचे आलेल्या तक्रारी घेऊन सिद्ध होत आहे. तर यामध्ये विविध कंपन्यांचे बनावट दस्त बनवून त्यावरही लुबाडणूक झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यानुसार तपासात आयपीसी कलम 467 सह विविध गंभीर गुन्हे आनखी दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या सर्व नागरिकांनी समोर येण्याचे आवाहन आझाद हिंद शेतकरी संघटनेचे विदर्भ संपर्कप्रमुख शेख सईद शेख कदीर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here