इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
शेगाव: येथील आजाद नगर परिसरात जळगाव जामोद येथील चौघांनी घरासमोर येऊन शिवीगाळ आणि घरात घुसून काठीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख नसीर शेख तालीम वय 47 वर्षे राहणार आझाद नगर यांनी शहर पोलीस स्टेशनला आज तक्रार दिली की ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत असून त्यांच्या मुलीचा घरगुती वाद असल्याने त्यांना फोन करून सांगितले की तुम्ही येऊन मुलीला घेऊन जा असे सांगितले यावरून जळगाव जामोद येथील अमीर खान मज्जिद खान, मुकखार खान आमिर खान, बबन आमिर खान व इक्बाल खान आमिर खान यांनी घरासमोर येऊन शिवीगाळ केली
व घरामध्ये येऊन चौघांनी काठीने मारहाण करून जखमी केले व जीवाने मारण्याची धमकी दिली अशा तक्रारी व मेडिकल सर्टिफिकेट वरून कलम 452 324 504 506 34 भादवी नुसार पुन्हा दाखल करण्यात आला आहे