आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे तेजभूषण फाऊंडेशन महाराष्ट्र कडून आवाहन..!

 

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

आंतरराष्ट्रीय पुरस्कार १३ मार्च २०२२ साठी प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी असून लवकरात लवकर आपले प्रस्ताव पाठवावे असे आवाहन तेजभूषण फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये तेजभूषण फाऊंडेशन, वृक्षमित्र,युवागौरव,समाजसेवक, कोरोना योद्धा,आदर्श पत्रकार,सामाजिक,वैद्यकीय,कला, क्रीडा,साहित्य,आदर्श व्यक्तिमत्व,कृषी,व्यवसाय व राजकीय तसेच कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्री/पुरुष,बालकांना,युवक/युवतींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी महाराष्ट्र तसेच गुजरात व मध्यप्रदेश येथील महाराष्ट्रीयन देखील प्रस्ताव पाठवू शकता.सर्व प्रस्ताव संस्थेकडे प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीकडून प्रस्तावांची छाननी करून पुरस्कारार्थीचे नावे जाहीर करण्यात येतील. प्रस्तावांसाठी तेजभूषण फाऊंडेशन संस्थापक / सचिव भूषण बिऱ्हाडे ८६०५८९७४०८,कोषाध्यक्ष सौ तेजस्विनी बिऱ्हाडे ९६७३७६६२०८ यांच्याशी संपर्क साधावा किंवा tejbhushanfoundation@gmail.com या ईमेल वर संपर्क साधावा.

Leave a Comment