इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव: दी.१३/१०/२०२३ ला शहरातील असंघटित कामगार यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश घेतला.शेगांव शहरातील स्थानिक पंचशील नगर मध्ये सदर पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडी च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.पंचशील नगर वार्ड शाखा अध्यक्ष अंबादास सहारे यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम आयोजित केला होता.
*या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडी चे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशाभाई खराटे,युवा जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वाकोडे,जिल्हा संघटक भाऊराव उमाळे,शेगाव तालुका अध्यक्ष दादाराव अंभोरे,शेगांव शहर युवा अध्यक्ष संदेशकुमार शेगोकार,शहर सचिव उदयराजे सुरवाडे,आयोजक अंबादास सहारे,प्रसिद्धी प्रमुख विशाल सरदार तथा असंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी वरिष्ठांच्या सुचणे नुसार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा शहराध्यक्ष संदेशकुमार शेगोकार उपस्थित होते.या वेळी जिल्हा महासचिव अतिशाभाई खराटे,युवा जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वाकोडे,तालुका अध्यक्ष दादाराव अंभोरे,युवा शहर अध्यक्ष संदेशकुमार शेगोकार या मन्यवरांनी नवनिर्वाचित पक्ष सदस्यांचा सत्कार केला व आपापल्या मार्गदर्शन पर भाषणातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणा विषयी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वार्ड शाखा अध्यक्ष अंबादासभाऊ सहारे,युवा शहर प्रसिद्धी प्रमुख विशाल सरदार व सर्व पंचशील नगर युवकांनी खूप मेहनत घेतली व संघटन केले त्यामुळे वंचित बहुजन आघाडी च्या वतीन त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.