अवैधरित्या देशी व विदेशी दारूची चार चाकी वाहनाने वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात अवैधरित्या देशी व विदेशी दारूची चार चाकी वाहनाने वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद पोलिसांना दिनांक आठ एप्रिल रोजी रात्री गुप्त माहितीवरून खात्रीलायक माहिती मिळाली कुर्हा काकोडा गावाकडून पिंपळगाव काळे या गावाकडे एक पांढर्‍या रंगाची मारुती सुझुकी क्रमांक एम एच २८ सी १३९६ या गाडीमध्ये देशी व विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक करणार आहेत अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून जळगाव जामोद पोलीस निरीक्षक श्री सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परलाद मदन व पोलिस नायक गणेश पाटील यांनी पिंपळगाव काळे येथे एम एस सी बी पावर हाऊस जवळ रात्री दीड वाजेच्या दरम्यान नाकाबंदी केली असता तेथे वर नमूद वर्णनाची सदर गाडी थांबविली असता सदर गाडी थांबून आरोपी पळून जात असताना एका व्यक्तीला पकडले तसेच एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पळून गेला.तसेच
पकडलेला व्यक्ती नांदुरा येथील असून त्याचे नाव विक्की राजेश ओवाळकर असे आहे सदर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये पांढर्‍या रंगाच्या पोतडीमध्ये देशी दारू टॅंगो पंच ९० एम एल च्या प्रत्येकी किंमत तीस रुपये च्या ४०० शिश्या एकुण किंमत १२००० हजार रूपये व इंम्पेरिअर ब्लू कंपनीच्या १८० एम एल च्या प्रत्येकी किंमत १४०रुपये च्या ४८ शिश्या एकुण किंमत ६७२० रूपये व मिळून आलेली गाडी जुनी वापरती पांढर्‍या रंगाची मारुती सुझुकी क्रमांक एम एच २८ सी.१३९६ किंमत ८०००० हजार रुपये व तीन पांढऱ्या रंगाच्या पोतड्या किंमत तीस रुपये असा एकुण ९८७५० रुपयाचा माल मिळून आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया साहेब अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी तडवी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांचे आदेशाने व सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन व पोलीस नाईक गणेश पाटील यांनी केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन व गणेश पाटील हे करीत आहेत.

Leave a Comment