अपंगाचे मानधन तत्काळ जमा करा- शेख अनिस पत्रकार अपंग जनता दल सामाजिक संघटना ची राज्य सरकार ला मागणी

 

हंसराज उके अमरावती

अमरावती :- राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर करण्यापुर्वी महाराष्ट्रतील अपंगाचा विचार केला नाही फक्त घोषणा केले की दोन महिना चा मानधन एकच वेळा मिडेल पण कधी मिडेल लोकडाऊन सुरु झाला आहे पहिलेच तर मानधन वेळेवर मिळत नाही . आणि चक्क लॉकडाऊन जाहीर केला . आम्ही प्रशासनाचे नियम पाळत असून कोणत्याही दिव्यांग व्यक्तींने व त्याच्या नातेवाईकांनी याबाबत तक्रार ही केली नाही . अपंग व्यक्तींनी लॉक डाऊनमध्ये उपचारसाठी धडपडतान कोणीही पाहिले असेल किंवा नसेल . त्यात मतिमंद , व्योवृद्व , गतिमंद ८० टक्के पेक्षा जास्त अपंग बांधवाच्या कुंटूबाची खुप बिकट परिस्थितीतून जात आहेत . आपलं सरकार अपंग व्यक्तिला तुटपुजी एक हजार रुपये अनुदान देते . पण तेही वेळेवर देत नाही . अपंग बांधवांनचा औषधांचा प्रश्न आहे . व्यक्तींना अंत्योदय आण्ण योजना काढली . ती फक्त कागदावरच राहिली आहे . कोणत्याही अपंग बांधवला कोरोना काळात , तरी सरकारने मदत करावी . महाराष्ट्र राज्य सरकारचे नियम आदेश आम्ही पाळतो . पण महाराष्ट्र राज्यातील २८७ आमदार आणि ४८ खासदार यांच्या लॉकडाऊन काळातील पेन्शन पगार बंद करून अपंग व्यक्तीना पाच हजार अनुदान द्यावे . या लॉकडाऊन काळात आमदार , खासदार यांना पगारीची काय गरज . त्यानी सर्व सामान्या व्यक्ती प्रमाणे अपंग व्यक्तीला मदत करावी अशी मागणी अपंग जनता दल सामाजिक संघटना चे अध्यक्ष शेख अनिस पत्रकार यांनी राज्य सरकार ला केले आहे .

Leave a Comment