मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण
यवतमाळ: अती धाडस एका तरुणाच्या अंगावर आले आहे . ,पुलावरून पाणी वाहत असताना मोटारसायकलने पूल पार करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे , अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पुराचा लोंढा आल्याने तो नदी पात्रात वाहून गेला आहे , नकुल जाधव असं या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे .
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील निंबर्डा येथे या भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी दुथडी भरून वाहत होती . अशातच या नदीचे पाणी पुलावरून मोठ्याप्रमाणावर वाहत होते .जीवाची पर्वा न करता नकुल याने जाते धाडस करीत नदीवरील पूल मोटारसायकलने ओलांडण्याचा प्रयत्न केला .पण पाण्याच्या एका मोठ्या लोंढ्याने त्याचे मोटारसायकलवरचे संतुलन बिघडले आणि तो नदी पात्रात वाहून गेला . त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो अद्याप सापडला नाही ,