राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
हिंगणघाट :मलक नईम राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदतीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचा (एनडीआरएफ) निकषांच्या दुप्पट मदद देण्याची राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.परंतु ज्यांनी मक्तानी शेती केली त्याच काय ? जिल्ह्यात जवळपास २० ते ३० टक्के शेतकरी हे मक्तेदारीने ( भाडयानी ) शेती करतात. ते शेतकरी सुद्धा अतिवृष्टीग्रस्त असून त्यांना देखील नुकसान भरपाईची आर्थिक मदद मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. विशेषतः विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर आले असता वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अतिवृष्टी भागाला भेट दिली तेथील शेतकऱ्यांचा व्यथा समजून घेतल्या व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदद देण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारांनंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला. परंतु ही आर्थिक मदद ७/१२ ज्याचा नावावर आहे त्याना मिळत असून मक्तेदार (भाडेतत्त्वावर) शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदद देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, कामगार नेते आफताब खान, सभापती हिम्मतसिंग चतुर, अशोक वांदिले, उत्तमराव भोयर, शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाणे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष हरीश काळे, उपाध्यक्ष जितेंद्र शेजवळ, सचिन तुळणकर,पिटु बादले, माजी नगरसेवक अनिल भोंगाडे,माजी नगरसेवक धनंजय बकाने, माजी नगरसेवक विनोद झाडे,राजू गधांरे, संजय चौहान,अमोल बोरकर, सुनील भुते, बालाजी गहलोत, जावेदभाई मिर्झा, गोविंद पुरोहित, गणेश वैरागडे, महिला शहराध्यक्ष सौ. मृनालीताई रिठे, सौ.मिनाक्षीताई ढाकणे, सौ. सुजाता जांबुलकर, सुरेश सायंकार, अमोल बोरकर, सुनील भुते, किशोर चांभारे, गोमाजी मोरे, मारोती महाकाळकर, प्रल्हाद तुराळे, माणिक लांडगे, सचिन मुरार, नितेश नवरखेडे, हरिदासजी काटकर, सचिन पाराशर, पंकज पाके, पियुष जैस्वाल, संजय कातरे, अतुल पाहुणे, गजू पिसे,विजय तामगाडगे, सौरभ साळवे, उमेश नेवारे, परम बावणे, नरेश चिरकुटे पप्पू आष्टीकर, अमोल मुडे, अमित झामरे, सुभाष खैरे, प्रदीप बागेश्वर, आरिफ शेख, शाहरुख बक्ष, जयपाल तामगाडगे, प्रतीक वावरे, सागर बारई, राजू मुडे ,प्रशांत मेश्राम,सुशील घोडे, पंकज भट्ट, वैभव भुते, मनिष मुडे आदी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.