अट्रावल मुंजोबा यात्रेत कोरोना संसर्ग नियमांची पायमल्ली नवस फेडण्यासाठी १० जणांनी यावे मंदीर विश्वस्तांचे भाविकांना आवाहन

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान मुंजोबा देवस्थान या ठिकाणी मराठी माघ महीन्यात दिनांक १३ फेब्रुवारी ते माघ पोर्णिमा २७ फेब्रुवारीपर्यंतचे यात्रा उत्सव सुरू झाले असुन , संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेली यंदाची यात्रा ही कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून नियमांचे अधिन राहुन यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असतांना देखील दर्शनासाठी भाविकांचा गर्दीचा ओघ पाहता मुंजोबा देवस्थान समस्त कोळी पंचकमेटी अट्रावल च्या वतीने सर्व भाविकांनी देवस्थानावर नव फेडण्यासाठी येतांना फक्त १० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असुन , भाविकांनी इतर दिवशीही देवस्थानाचे दर्शन घेता येईल , कोरोना विषाणु संसर्गा पार्श्वभूमीवर सदर शासनाच्या प्राप्त झालेल्या सुचनांचे पालन करून देव दर्शनासाठी नियमांचे काटेकोर पालन करून दर्शनासाठी यावे असे असतांना देखील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडुन व स्थानिक आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या व विश्वस्त मंडळाच्या दिरंगाईमुळे कोरोना विषाणु संसर्गाच्या नियमांना धाब्यावर ठेवुन यात्रेत भाविकांची मोठी गर्दी उसळली असुन , या गर्दी कडुन शासनाचे सर्व नियमांचे उल्लघंन होतांना दिसुन येत आहे . तरी उर्वरीत यात्रा उत्सवासाठी दर्शनासाठी भाविकांनी कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे असे आवाहन मुंजोबा देवस्थान विश्ववस्तच्या वतीने अध्यक्ष ललित किटकुल कोळी , दिपक तायडे , प्रभाकर कोळी, अनिल कोळी , जनार्दन कोळी , विक्रम कोळी, जगन कोळी आणी पोलीस पाटील पवन चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे .

Leave a Comment