कोरोना संसर्गामुळे सगळीकडे लॉकडाऊन प्रक्रिया संपून आता अनलॉक प्रक्रिया सुरू आहे,अश्यात आता टप्याटप्याने शाळा कॉलेज सुरू झालेत पण अश्यात ग्रामीण भागामध्ये बस फेऱ्या कमी आहे आणि अश्याने विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करत शाळा महाविद्यालयांमध्ये जावे लागत होते परंतु विद्यार्थ्यांची ही स्थिती भयंकर आहे हे लक्षात घेऊन बोरगाव बु!! येथील विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल फदाट यांनी बस आगार प्रमुख जाफराबाद यांना निवेदन देऊन बस फेऱ्या वाढवण्याची विनंती केली मात्र ती विनंती अपयशी ठरली परंतु हर्षल फदाट व सहकारी विद्यार्थ्यांनी याचा सतत पाठलाग करून बस फेऱ्या वाढून घेतल्या. आता बोरगाव बू!! येथे बस फेऱ्या वाढल्याने विद्यार्थी नियमित शाळा व महाविद्यालयांमध्ये जात आहे आणि याच समाधान विद्यार्थी व्यक्त करत आहेत.