सेलू/परभणी अजहर पठाण
सेलू तालुक्यातील ग्रामीण वलंगवाडी ह्या गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा दीड किलोमीटर डांबरीकरण सुरू करण्यात आले. येथील गावाला पक्का रस्ताच नसल्यामुळे गावातील नागरिकांचे हाल होतात. रां. मार्ग क्र.253ला लागून पाच की. मी. अंतर असलेल्या या गावात रस्ताच अस्तित्वात नव्हता. येथिल रस्त्याचे नोंद ग्रामीण रस्ते क्र. नव्हते यामुळे या मार्गावर निधी टाकण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या. हाच प्रश्न घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते ह. भ. प. दगडोबा जोगदंड महाराज यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन शासकीय पातळीवर पाठपुरावा करून जी. प. विभागातर्फे
दीड की. मी. डांबरीकरण मंजूर करून घेतले व कामाला सुरुवात झाली. रस्त्याचे काम मार्गी लागल्याने गावकरी मंडळी आनंदित झाली.