जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील..
पीडित माता-पिता
बुलढाणा:
पीडित मुलीचे अपहरण प्रकरणात अखेर मुलीसह आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर FIR- 575/22 माधवी कलम 363, 376, (2 )(J)(N) सहकलम 4,8,12 पोक्सो कायदा 2012 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुलीला आई वडिलांपासून लांब ठेवत बाल सुधार गृहात ठेवण्यात आले आहे.
मुलगी आई-वडिलांसोबत बोलू इच्छित नाही.त्यांच्यासोबत राहू इच्छित नाही. अशी बनावट माहीती आई-वडिलांना देत मुलीला भेटू दिले नाही. विशेष म्हणजे मुलगी स्वतःहून पोस्टेला आल्याची माहिती तपास अधिकारी घोडेस्वार यांनी दिली.
परंतु तपास अधिकारी घोडेस्वार यांच्यासह, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने विविध पथक नेमण्यात आले होते. सदर पथकांच्या कार्यालयीन नोंदी आहेत.
तर जळगाव खान्देश, औरंगाबाद व इतर विविध ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. ज्यावेळी तपास पथक जळगाव खान्देशात गेले तेंव्हा त्यांना मुलगी आढळून आली नाही का..? आरोपी आढळून आला नाही का..? मग आरोपीला कुठून अटक केली,की तोही स्वतःहून आला हे ही प्रश्न अद्याप अनूत्तरीतच आहेत.तर खूलेआम कायद्याची पायमल्ली करणारे असे अनेक प्रश्न नाट्यमहिरीत्या समोर येत होते.
सदर प्रकरणात स्थानिक आमदार माजी मंत्री संजय कुटे यांचे नाव समोर आले. मुलीचे अपहरण होण्याअगोदर आमदार संजय कुटे यांनी पीडित मातापित्यांना घरी बोलवून सदर मूलीचे अपहरण होऊ शकते अशी माहिती दिली होती. ज्यावेळी त्यांना आमदारांनी बोलविले त्यावेळेस आमची मुलगी घरी होती. जेव्हा आमदार कूटेंसोबत चर्चा सुरू झाली आणि संपली. त्यानंतरच मुलीचे अपहरण झाले. त्या दरम्यानच मुलगी घरून गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलीस प्रशासनावर सह आरोपी मध्ये आमदार संजय कुटे यांचे नाव घेण्याचे धाडस होणार आहे का…? कमीत कमी त्यांचा जबाब आजपर्यंत पोलीस प्रशासनाने नोंदविला का..? गून्ह्यात राजकीय हस्तक्षेप आणि पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळेच पीडित मुलीच्या अपहरण प्रकरणांमध्ये प्रत्येक क्षणाला नाट्यमय घडामोडी घडत आहे.
परंतु त्यामध्ये कायद्याची पायमल्ली करण्याचे धाडस आजही होत आहे.
तर राजकीय दबावाखाली प्रकरण दाबण्याचा, आरोपीला वाचविण्याचा प्रयास मागील तीन महिन्यापासून आजही सुरूच आहे.
परंतु पीडित माता-पित्यांनी आणि आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग, सीबीआय सोबत संपर्क साधला. सदर प्रकरणात पीडित मातापित्यांनी १२ डिग्री थंडीत सलग पाच दिवस केलेलं आमरण उपोषण. आझाद हिंदने केलेले विविध आंदोलन.
यामूळे कुंभकर्णी झोपेतील पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले. तीन महिन्यानंतर तपासाला सुरुवात झाली. नियमानुसार मुलीचे बयान घेत रात्री उशिरा गुन्हे दाखल झाले आहेत.
सदर प्रकरणात सह आरोपी म्हणून राजकीय क्षेत्रातील काही मोठी नावे सदर गुन्ह्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
जीव गेला तरी चालेल परंतु जोपर्यंत प्रकरणाचा निःपक्ष तपास होत नाही.तोपर्यंत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहील.
अशी प्रतिक्रिया बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत पीडित मातापित्यांनी दिली.
पत्रकार परिषदेला आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे, बहुजन महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सिंधुताई अहिर, जिजाऊ ब्रिगेडच्या पंचफुलाबाई गवई, घाटाखालील महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई ताथरकर, राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे,विदर्भ संपर्कप्रमुख शेख सईद यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.