फुलंब्री प्रतिनिधी
सागर जैवाळ
अखिल भारतीय जिवा सेनेची फुलंब्री तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात फुलंब्री तालुका अध्यक्षपदी नवनाथ वखरे यांची निवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी प्रविण नाईक,तालुका सचिवपदी संदीप दत्तू काळे ,तालुका उपाध्यक्ष पदी सुनील बिडवे , शहर उपाध्यक्षपदी पवन वाघ, शहर सचिवपदी किरण सुरडकर यांची निवड करण्यात आली आहे.
फुलंब्री येथे संत सेना भवन येथे पार पडलेल्या बैठकी दरम्यान मराठवाडा प्रवक्ता सुरेश बोर्डे,जिल्हाध्यक्ष मुंजाभाऊ भाले,संत सेना सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष संजय पंडीत,शरद पंडीत,सोमीनाथ तावरे,आशोक नाईक,मन्साराम नाईक,शंकर बोर्डे,रूपेश नाईक, भैय्या पंडित , आकाश तावरे,कृष्णा बिडवे,भाऊसाहेब नाईक ,कैलास वखरे,संतोष वखरे हे उपस्थित होते.