गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी:-
-जळगाव जा
कोरोना सारख्या जागतिक महामारीत मोलाचे योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार आज दि. 27 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे महासचिव मा. मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने बुलढाणा जिल्हा काँग्रेस च्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्हाभर आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी जळगाव (जा) येथील बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात असलेल्या कोविड केअर सेंटर येथे कार्यरत असलेले डॉक्टर मंडळी, नर्सिंग स्टाफ, सफाई कामगार, तथा इतर कर्मचारी यांचा आज जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
या कठीण प्रसंगी आपण सर्व जनतेला मोलाची सेवा देत आहात. आपल्या परिवारासोबत स्वतः जोखीम पत्करत सेवा देत आहे हे खरोखरच पुण्याचं काम आहे, असे गौरवोउदगार मान्यवर मंडळींनी काढले. तसेच याप्रसंगी जळगाव शहरात या संकट काळात रुग्णसेवा देणाऱ्या प्रायव्हेट डॉक्टर मंडळी तसेच पॅथॉलॉजी ची सेवा देणाऱ्या मंडळींचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम हा तिन दिवस चालणार असून या कार्यक्रमाला जळगाव जामोद मतदार संघाच्या नेत्या डॉ.सौ. स्वातीताई वाकेकर, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई ढोकणे, जळगांव जा काँग्रेस चे अध्यक्ष अविनाश भाऊ उमरकर, बु.जि. काँग्रेस चे सरचिटणीस राजुभाऊ पाटील, तसेच अमरभाऊ पाचपोर , शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन भाऊ घोलप, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, कलीम मिस्त्री, माजी प.स.सभापती प्रवीण भोपळे, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष राजीक , मंजुराबाई इंगळे, अंजनाबाई उंबरकार, अशोक साबे, महेंद्र बोडखे, राजू भाई, शे.जुनेद, विक्की उमरकर, गोपाल कोथळकार, सुरेश वानखडे, हुसेन भाई, हरीश भाईजी, अमोल हागे, कृष्णा खिरोडकार इ.उपस्थित होते.