गजानन सोनटक्के जळगाव जा. प्रतिनिधी.
अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना दिनांक ६ ऑगस्ट रोजी पहाटे तीनला पिंपळगाव काळे येथे उघडकीस आली आहे. सदर घटनेची फिर्याद मुलीच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.फिर्यादी मुलीचे वडील पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर फिर्यादी ची मुलगी ही अकरावीत शिकत आहे. ती दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी शेतातून घरी आली.व रात्री जेवण करून सर्व झोपले असता आज पहाटे ३ वाजता फिर्यादी चा मुलगा पाणी पिण्यासाठी उठला असता त्याला ती अंथरुणावर दिसली नाही. त्यामुळे त्याने वडिलांना व आईला उठवले सर्वांनी तिचा गावभर शोध घेतला.मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी दिनांक ६ आँगष्ट च्या सकाळीच पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोण्यातरी अज्ञात इसमाने रात्रीतून आपल्या मुलीचे अपहरण केले असल्याची तक्रार जळगांव पोलीस स्टेशनला दिल्यावरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगांव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनास पी.एस.आय.प्रल्हाद मदन करीत आहे.