अंकलेश्र्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्याचे काम करा अन्यथा आंदोलन आरपीआय (आठवले)गटाचे एन. एच ला निवेदन

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

 

अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्यासाठी आरपीआय आठवले गटाचे युवा जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी आज दिनांक :-२८/०२/२०२३ रोजी,भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण ऑफिस चे उपअभियंता दिग्विजय पाटील(साईट इंजिनिअर)यांना निवेदन देऊन काम तात्काळ मार्गी लावा नाही तर आंदोलन करु असे लेखी निवेदन दिले

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असे समजेनासे झाले आहे,त्याच बरोबर सदर (NH) हायवे मधील यावल ते चोपडा रस्त्याची अतिशय चिंता जनक अवस्था झाली

आहे,तरी अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर नुतनीकरण (नवीन) करण्यात यावा तसेच,यावल ते चोपडा रस्ता सध्या शेवटची घटका मोजत असून त्या रस्त्यास जीवनदान म्हणून तात्पुरती डागडुजी करण्यात यावी,जेणे करून जे अपघात घडत आहेत ते थांबतील त्यामुळे नाहक प्रवाशी बांधवांना आपला बळी द्यावा लागत आहे,

तसेच सदर रस्त्याच्या संदर्भात आपले शाखा अभियंता जाणून बुजून दुर्लक्ष करतात का तसेच आपल्या कार्यात निष्काळजी पणा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे,तरी अश्या काम चुकार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी,जेणे करून त्यांचा मनमानी कारभार बंद होईल.

सदर अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्याचे नुतनीकरण एका महिन्यात सुरु करावे तसेच यावल ते चोपडा रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी अन्यथा आर.पी.आय आठवले गटाचे जळगांव जिल्हा अध्यक्ष राजु सुर्यवंशी आणि युवा जळगांव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच संदानशिव यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले की,अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता मात्र तो आता नॅशनल हायवे (एन.एच) यांच्या कडे वर्ग करण्यात आलेला आहे,सदर रस्त्याबद्दल अनेक दिवसांपासून अनेक राजकीय पक्ष रस्तादुरुस्तीची मागणी करत आहेत,मात्र त्यांना माहितीच नाही की सदर रस्ता हा कोणाच्या मार्फत करण्यात येईल किंवा होईल हि मोठी शोकांतिका आहे.

तसेच जनतेने नेमून दिलेले लोकप्रतिनिधी जाणून बुजून सदर रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा घणा घाती आरोप त्यांनी केला आहे,तर सदर निवेदन देते वेळी युवा जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव व आर.पी.आय आठवले गटाचे यावल तालुका सदस्य किरण तायडे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment