हेडलाईन- ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एम आय एम) मार्फत शेगाव तहसीलदारांना निवेदन

 

शेगाव प्रतिनिधि इस्माइल

महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाला मदत करण्यासाठी व समाजाच्या बेरोजगार तरुणांना शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुलांना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. परंतु या मंडळामार्फत फक्त शैक्षणिक कर्ज योजना राबवली जात आहे.
शैक्षणिक कर्ज योजने सोबतच बेरोजगार तरुणांना मंडळामार्फत कमी व्याजदरात कर्ज प्रकरण मंजूर करून, त्यांना कर्ज वाटप करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र शासनाने मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाची कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी स्वातंत्रपणे उघडण्यात यावे. व कर्ज मंजूर प्रकरण हे मुंबई ऐवजी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयातून करण्यात यावे. वरील मागण्या तात्काळ माननीय मुख्यमंत्री महोदय व संबंधित मंत्री यांनी आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी चर्चासत्र बोलावून तत्काळ मार्गी लावावा अन्यथा हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ऑल इंडिया मजलीस फतेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या तर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. पुढील सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील असा इशारा देखील देण्यात आला. आपल्या सहिणीशी निवेदन देताना (एम.आय.एम) चे शहर अध्यक्ष शेख मुख्तार हाजी शेख बुढाण, शेख जहीर शेख जमीर, शेख इरफान शेख इकबाल ,शेख सावीर शेख सत्तार, शेख मोईन शेख मुनाफ,अजगर बेग अख्तर बेग,शेख निस्मिल्लाह शेख इस्माईल,मोहम्मद जावेद मोहम्मद इकबाल इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Leave a Comment