संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी

 

हिंगणघाट : -(प्रतिनिधी )
22 जुलै अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना, श्री संत भिकाराम फाउंडेशन, सुरक्षा फाउंडेशन इंडिया यांच्या कडून हिंगणघाट तालुक्यातील पुरग्रस्त जनतेला तात्काळ आर्थिक स्वरूपात मदत करण्यात यावी यासाठी हिंगणघाट उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट तालुक्यात १५ दिवसापासुन सतत पावसाच्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे शेतजमीन, शेतातील पिक, घर व घरातील उपयोगी वस्तु हे सर्व पावसाच्या पाणी मुळे आलेल्या पुरात कुटूंब उदवस्त व विसकळीत झालेले आहे.
तरी महाराष्ट्र शासनाव्दारे हिंगणघाट तालुक्यातील पुरग्रस्त जनतेला लवकरात लवकर आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात यावी अशी मागणी अविनाश नवरखेले (अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना वर्धा जिल्हाध्यक्ष), राजू हिंगमिरे ( श्री संत तुकाराम फाउंडेशन अध्यक्ष), रोहित राऊत(सुरक्षा फाउंडेशन इंडिया अध्यक्ष), सुरज साळुंकी, गौरव खिराळे, प्रलय पाटील, बुद्धभूषण वाठोरे, चेतन दहिवलकर, यश इताडे, रवी चौधरी, कैलास ठाकूर, निखिल काटकर, गुड्डू मोरया, ओम प्रकाश पंडित, गुड्डू ठाकूर, धीरज साळवे, श्रवण वाट, पदाधिकारी यांनी केली

Leave a Comment