शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी कृषिदूत शेतकऱ्यांच्या बांधावर

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित स्वा. विर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यी वैष्णवी नानकदे, आचल राजपूत, दीपाली भिलावेकर व प्रथमेश काळपांडे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जळगांव जामोद येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी कृषिदूतांनी येत्या रब्बी हंगामाची चाहूल बघता शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व त्याचे फायदे समजून सांगितले. बीज प्रक्रिया करते वेळीच्या विविध उपाययोजनांचा समावेश करून घेण्यात आला. बीज प्रक्रिया करून आपण कितीतरी रोग व किडीचे नियंत्रण किफायतशीर पणे करू शकतो व तसेच बियाण्याची उगवण क्षमताही वाढण्यास मदत होते हे यावेळी शेतकऱ्यांना पटवून दिले. बीज प्रक्रियेसाठी बाजारात उपलब्ध रसायनांची माहिती यावेळी कृषिदूतांनी शेतकऱ्यांस दिली. सोबतच कृषिदूतांनी शेतकऱ्यांना उगवण चाचणी कशी करावी व त्याचे महत्व पटवून दिले. यासाठी असलेले विविध प्रकार व त्यांच्या शास्त्रशुद्ध पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर केले. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे बोगस बियाण्यातून होणारे नुकसान वेळीच ओळखून शेतकऱ्यांचे हित साधता येईल, असे शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास अनिल नानकदे, गणेश नानकदे, दीपक नानकदे व नंदू काळपांडे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कृषिदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रम अधिकारी व वनस्पतीशास्त्र विषयतज्ञ अविनाश आटोळे सर, कार्यक्रम समनवयक व्ही. टी. कपले मॅडम, व वनस्पती रोगनिदानशास्त्र विषयतज्ञ प्रमोद डव्हळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment