संग्रामपुर तालुक्यातील सततच्या पावसामुळे व कीडीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्वरीत पीक विमा मंजुर करुन आर्थिक मदत देण्याची मागणी तालुका भाजपच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुकयातील शेतकऱ्यांचे सोयाबीन उडीद मुंग तसेच मका पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच पिक आनेवारी काढण्या संदर्भात विमा कंपनीचे प्रतिनीधी जानुन बुजुन शेतकऱ्यांना वंचीत ठेवण्याचा उददेशाने पीक आनेवारी जास्त़ प्रमाणात काढत आहेत तो प्रकार बंद करावे . पिक विमा मंजुर करुन आर्थिक मदत द्या, यासह विविध मागणीचे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे. हयावेळी जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख, तालुकाध्यक्ष लोकेश राठी, गणेश दातीर , अंबादास चव्हाण, पांडुरंग हागे, रामदास म्हसाळ , विलास इंगळे, सुभाष हागे, नारायण अवचार ,पांडुरंग इंगळे, यासह तालुकयातील बहुसख्य़ भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.