सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या आडवळणाच्या गावातील जिल्हा परिषद मराठी उच्च शाळा येथील दहापैकी आठ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे ।लातूर येथील शिक्षक सोमनाथ लोमटे हे गावासाठी रंजी सिंह डिसले गुरुजी प्रमाणेच धावून आले हे प्रकर्षाने या वेळी जाणवले आहे !लातूर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुण शिक्षक श्री लोमटे सर हे यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आयएएस अधिकारी व्हायचे आहेपरंतु काहीतरी इतरांना घडावे म्हणून त्यांनी शिंदी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकी पेशा स्वीकारला व आपल्या अंगी असलेल्या सप्त गुणाद्वारे विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले !त्यांनी वर्ग 5 च्या दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवले व त्या दृष्टीने त्यांचा अभ्यास ते करून घेत असत !त्यांचा परिणाम म्हणून दहापैकी आठ विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पास झाले व त्यांचा अमरावती येथील विद्यानिकेतन मध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे !यामध्ये सिद्धार्थ रामेश्वर खंडागळे .निखिल सुनील बंगाळे ,पुष्कर विनोद खिल्लारे ,रोहन अनंता दहातोंडे, सिद्धार्थ खंडू गवई, सिद्धार्थ मिलिंद गवई प्रवीण सुनील खरात, गणेश सिद्धेश्वर बंगाळे, या मुलांनी सोमनाथ लामटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केली आहे त्यांच्या यशामुळे संपूर्ण शिंदी गावामध्ये परिसरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे ‘यावेळी मुख्याध्यापक मधुकर रिंढे विषय शिक्षक सोमनाथ लोमटे सहशिक्षक राजेंद्र देशमुख विष्णू ठोसरे गौतम इंगळे परिहार मॅडम ‘ उकंडा खंडारे सर यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले आहे ‘