राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटना द्वारा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये तसेच वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाच वेळेस श्रम कानून, ठेकेदारी प्रथा, कर्मचारी बोनस, नवीन श्रम कानून मध्ये 8 घंट्याचा बदल्यात 12 घंटे काम आणि ओव्हर टाईम करण्यास परवानगी (बिन पगारी), महिलांना रात्रीला काम करण्याची अनुमती, फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट नुसार नियमित नोकरी समाप्त व न्यायालयाचे दरवाजे बंद, सुरक्षा आणि बोनसची मांग करता येणार नाही इत्यादी कानून केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेले आहे, त्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटने द्वारा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तसेच वर्धा जिल्ह्यात या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुद्धोधन धनवीज यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये बामसेफचे जिल्हाध्यक्ष संजय कुंभारे, कार्याध्यक्ष बंटीभाऊ अंबादे, मनोज लोवे, विठ्ठल दांडगे, लक्ष्मीकांत जवादे, सुनील मसाने, चंद्रकांत शिंगणापुरे, नानाजी कोल्हे, सुशीला जिंदे, श्रेया राऊत, पल्लवी चौधरी, प्रांजल लोहकरे, नंदकिशोर पाढेन, प्रतीक गायकवाड, शितम मंद्रेले, डॉ.रत्तू निमजे, संजय बावणे, हर्षपाल मेंढे, प्रफुल कांबळे, संजय कांबळे, धर्मपाल आगलावे,राहुल वाहने, नागसेन पाटणकर, दामोदर म्हात्रे, राहुल बदडे, मनसज्जन मोटघरे, चंद्रशेखर वासनिक,सचिन फुलके, दीपक मेंढे, यश निमजे, राहुल बर्डे, निलेश वाळके, बंडू वानखेडे, अशोक बुटले, हर्षवर्धन मेंढे, अरुण वाघमारे शुद्धोधन अलोणे व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष गेमदेव मस्के इत्यादींनी आंदोलनास साथ- सहयोग केला.,, नईम मलक हिंगणघाट